मुंबई - देशात अजूनही आदिवासी समाजांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी म्हणाव्या तितक्या मिळत नाहियेत. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक व आर्थिक विकास होताना दिसत नाही. मी विजय कुमार गावित स्वतः आदिवासी विकास मंत्री बनण्याआधी या आदिवासी समाजाचा एक भाग आहे. मला यांच्या समस्या जवळून माहीत आहेत, व राजकारणात आल्यापासूनच त्यांच्या विकासाची कळकळ आहे. परंतू आता रोजगार मिळवण्यासाठी फार उच्च शिक्षणाची आवश्यकता नाही. आपलं सरकार आता कौशल्य विकासावर भर देत आहे. यामुळे आपल्या आदिवासी बंधनांना अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाचा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाअंतर्गत नव्या पिढीतील आदिवासी तरुणांच्या रोजगारासाठी "एकलव्य कुशल योजना" आणली आहे. आपल्या नव्या आदिवासी पिढीच्या कौशल्यास यशस्वी करिअरची दिशा देणारी ही अभिनव योजना आहे.
या योजनेअंतर्गत आदिवासी तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण त्याच बरोबर आदिवासी बांधवांची शैक्षणिक जागृती व सामाजिक व आर्थिक प्रगती देखील होणार आहे. आता माझे आदिवासी बांधव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व विदेशातही स्वतःचं व आदिवासी समाजाचं नाव मोठं करू शकतात.
राज्यातील सर्व आदिवासी तरुणांना मी हक्काने सांगतो, या योजनेचा लाभ घ्या व मिळालेल्या संधीचं सोनं करा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.eklavyakushal.in ya पोर्टल वर नोंदणी करा, मोफत प्रशिक्षण मिळवा आणि रोजगाराची संधी मिळवा.
लक्ष्य अचूक यशाचे... सर्वांगीण प्रगती