मुंबई -आदिवासी बांधव हे आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. असे बैठकीत आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी प्रतिपादन केले तर ते पुढे म्हणाले की आदिवासी समाजातील विकास व त्यांचे कल्याण हे देखील शासनाचे कर्तव्य आहे. याच विचारातून गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
या मेळाव्यात आदिवासी लाभार्थ्यांना न्युक्लिअस बजेट योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शबरी घरकुल योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन तसेच पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी थेट लाभ देण्यात येणार आहेत.
दि. 21 फेब्रुवारी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी,दि. 22 फेब्रुवारी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली,अहेरी,दि. 23 फेब्रुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, चिमूर, दि.24 फेब्रुवारी यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, झरीजामनी आणि दि. 25 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, कळंब येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यास जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधवांनी उपस्थित रहावे.असे ते ह्यावेळी बोलले