ऐनपूर ता. रावेर:- येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग जिल्हा परिषद,जळगाव यांच्यामार्फत शाळेतील विद्यार्थ्याना जंतनाशक गोळ्या (Albendazole Tabalets) देण्यात आल्या.राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश्य हा १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे,पोषण स्थिति,शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा आहे. असे शाळेत उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी सांगितले.तसेच बालकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यानी व शाळेतील शिक्षकांनी स्वतः गोळ्या खाऊन दाखविल्या.तसेच १ ते १९ वयोगटातील शाळा बाह्य मुलांना, आशा स्वयंसेवका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या देण्यात येणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.