नवी दिल्ली - देशभरातील ‘पीस स्टेशन्स’ म्हणजेच शांततामय केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक म्हणजेच विजेवर चालणाऱ्या वाहनांचा मर्यादित संख्येत वापर सुरु करण्याचा प्रस्ताव भारतीय लष्कराने मांडला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीचा स्वीकार करणे, हरित उर्जेला चालना देणे आणि जैविक इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे ही या निर्णयामागील ध्येय आणि उद्दिष्ट्ये आहेत. भारतीय लष्कर खालील प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांचा पीस स्टेशन्समध्ये वापर सुरु करणार आहे
हलकी वाहने (इलेक्ट्रिक)
बस (इलेक्ट्रिक)
मोटर सायकल्स (इलेक्ट्रिक)
मड्डीला गुरुमूर्ती आणि कुरुवा गोरंटला यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली.