निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रविण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( महसूल शाखा )श्रीमती ज्योती गुंजाळ,निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सामान्य शाखा ) विजय बनसोडे, वाहतूक व्यवस्थापनासाठीचे नोडल अधिकारी तहसीलदार ( टंचाई शाखा ) विजय सुर्यवंशी, नोडल अधिकारी संगणक, इंटरनेट,सायबर सुविधेसाठी सहायक संचालक ( एन. आय. सी ) महेश पत्की, मतदार जागरूकता ( स्विप) चे नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील असणार आहेत. ईव्हीएम सुरक्षा, कायदा सुव्यवस्थाचे नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, ईव्हीएम व्यवस्थापन तहसीलदार ( संजय गांधी निराधार योजना ) अनिल पूरे, आदर्श आचार संहितेचे अनुपालन नोडल अधिकारी अपर जिल्हादंडाधिकारी एस. आर. कासार, खर्च विषयक नियंत्रणचे नोडल अधिकारी महानगरपालिकेचे मुख्य वित्त अधिकारी चंद्रकांत वानखेडे, बॅलेट पेपर, पोस्टल बॅलेट व इटीपीबीस चे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन )विजयकुमार ढगे, प्रसार माध्यमचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कम्युनिकेशन नोडल अधिकारी तहसीलदार ( टंचाई विभाग) विजय सुर्यवंशी, मतदार यादी नोडल अधिकारी तहसिलदार (निवडणूक शाखा ) सुनील समधने , निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीचे निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे नोडल अधिकारी म्हणून सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजवार तर निरीक्षकांसाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी हे काम पाहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.
०००००००