जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालय व उपवनसंरक्षक, यावल व पोलीस अधिक्षक जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली वनसंरक्षणाकरीता यावल वनविभाग जळगाव मधील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण ५ ते २४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत
देण्यात आले आहे.
याआधी खुप वर्षापूर्वी यावल वनविभागात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
सदर शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण हे मुख्यत: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जळगाव येथे आयोजित करण्यांत आले होते. सदर प्रशिक्षण हे यावल वनविभाग जळगाव मधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणा करीता देण्यांत आलेले आहे. ५ ते २४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांचे मार्फत शारीरीक कवायत (P.T) ड्रिल, शस्त्र कवायत (ड्रिल) तसेच शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण त्यामध्ये ७.६ २.mm SLR व ९ mmपिस्टल यांचे खोलना – जोडना, ॲम्युनिशन भरना- खाली करना, वेगवेगळे फायर पोझीशन सोबत फायर करना इत्यादी प्रकारचे सराव यावल वनविभागातील वनक्षेत्रापाल, वनपाल व वनरक्षक यांचे कडून करुन घेण्यात आले आहे.
शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यांत आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना २४ ते २६ फेब्रुवारी रोजी फायरिंग रेंजवर फायरिंग बाबत प्रशिक्षण देखील देण्यात आले. सदर दिवशी मा. जिल्हाधिकारी जळगाव, व मा. उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव हे उपस्थित होते त्यांनी सदर प्रशिक्षणबाबत कौतुक केले. व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणा बाबत मोलचे मार्गदर्शन केले. राखीव वनात उपप्रवेश करुन सोबत शस्त्र घेवून अवैध वृक्षतोड अतिक्रमण व अवैध शिकार करण्यासाठी जे अज्ञात इसम जंगलात त्यांना अटकाव करण्यासाठी तसेच त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी , संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणाकरीता मा. पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांचे सहकार्य लाभले, असे आवाहन सहा. वनसंरक्षक वनीकरण व वन्यजीव चोपडा यावल वनविभाग जळगाव यांनी केले आहे.
०००००००००००