रावेर ता : भारतीय जनता पक्षाच्या 'गाव चलो' अभियानांतर्गत महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील लालमाती या गावात मुक्काम केला. गावातील नागरिक, आश्रमशाळेतील विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण याही उपस्थित होत्या.
या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ. केतकी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अन्य उपक्रमांत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह लहान मुलांनी डॉ. केतकी यांच्याबरोबर सेल्फीही घेतले. दरम्यान विद्यार्थी यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले तसेच दहावी च्या विद्यार्थी यांना बोर्ड परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनीष तडवी, अधीक्षीका एम एस बावणे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सौ.सारिका चव्हाण, प्रकाश चव्हाण, मुसीर तडवी, राजू तडवी, इरफान तडवी, यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते