सहा पोलिसांना सुप्रीम कोर्टाने ठोठावला १२ लाखांचा दंड

Aadivashi Ekta Manch Live
0

जळगाव : जळगावच्या सहा पोलिसांनी विजयकुमार विश्वनाथ ढवळे आणि विनोद दोधू चौधरी यांच्यासह तीन भाडेकरूंना ९ मार्च २०२२ रोजी पोलिस ठाण्यात बोलावले आणि त्यांना २४ तास कोठडीत ठेवले होते तर तिघा जणांना बेकायदा ताब्यात घेण्यासह त्यांची भाड्याची जागा न्यायालयीन आदेशाविना पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना एकुण बारा लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. पोलिस निरीक्षक, एक पोलिस उप निरीक्षक, तिन हवालदार आणि एक हेड कॉन्स्टेबल अशा एकुण ६ जणांचा यामधे समावेश आहे.

भाडेकरूंना बेकायदा ताब्यात घेण्याच्या गुन्ह्यात कट रचण्यात आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात, सक्षम न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाशिवाय वादग्रस्त जागा पाडून टाकण्यात त्यांची स्पष्ट भूमिका होती, अशा प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांना मुक्त होण्यास परवानगी का देण्यात आली? यावर खंडपीठाने आपण समाधानी नसल्याचे सांगितले.’


तीन हवालदार, एक हेड कॉन्स्टेबल, एक उपनिरीक्षक आणि एका निरीक्षक यांना दंडाची रक्कम आजपासून चार आठवड्यांच्या आत सशस्त्र सेना युद्धातील शहीद कल्याण निधी, कॅनरा बँक, शाखा दक्षिण ब्लॉक, संरक्षण मुख्यालयाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले.  न्यायालयाने स्पष्ट केले की, त्याची निरीक्षणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांना भाडेकरूंना भरपाई देण्यास सांगणारे निर्देश त्यांच्या पदोन्नतीत प्रतिकूल मानले जाणार नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !