इसासनी - ता. हिंगणा, जि. नागपूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व वंचित बहुजन आघाडी इसासनिच्या नेत्या मीनाताई मेश्राम, राजेश जंगले, विवेक शेवाळे यांच्या पुढाकाराने भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा या पक्षांना सोडचिठ्ठी देत माजी ग्रामपंचायत सदस्यांनी, युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी, सामाजिक क्षेत्रातील असंख्य महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत नागपूर ग्रामीणमध्ये प्रस्तापित पक्षांना जोरदार हादरा दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या इसासनि ग्रामपंचायत सदस्या कांचनताई वासनिक व उषाताई वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी युवा जिल्हाअध्यक्ष मनीष बोरकर, सुभाष मानवटकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रामटेके ताई, रेखाताई धूपे, महानंदाताई राऊत, अभिजित पडघण, सुजाताताई ढोले, प्रिया राहुल मेश्राम, धनराज वासनिक, अश्विन वाघमारे, महेंद्र मेश्राम, मुन जी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.