वरखेड (ता. चिखली) येथील या शाळेच्या प्रांगणात ५२ लाख रु.च्या दोन मजली वर्गखोल्यांचे व ९.५० लाख रु.च्या दुरुस्ती कामाचे उद्घाटन या वेळी केले. एकूण ६१.५० लक्ष रु.च्या ३ विकासकामांचे उद्घाटन या वेळी केले. शाळेस यापूर्वी १ कोटी रुपये व आता ६१.५० लाख रु. निधी उपलब्ध करून दिला असून ३ हजार चौरस फुटांचा डोमही उभारण्यात येईल. सौर विजेसाठी ४० लाख रु. निधी लवकरच देण्यात येईल व यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. पालकांच्या मागणीनुसार येथे सीबीएसई मंडळाचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरु होईल असा शब्दही या वेळी दिला.
या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी सर्वश्री उमेश जैन, गटशिक्षणाधिकारी मोरे, सहाय्यक पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे, केंद्रप्रमुख आर. आर. पाटील, प्रा. वीरेंद्र वानखेडे, समाधान कणखर, दत्तात्रय कणखर, देविदास कणखर, सरपंच विनोद कणखर, पोलीस पाटील संगीता कणखर, गणेश भगत, रवी पाखरे, सुलोचना कणखर, रवी भगत, लक्ष्मणराव शेळके, अरुण पाटील, करणखेडचे सरपंच रवी इंगळे, पेठचे सरपंच विष्णू शेळके, पांढरदेवचे सरपंच चेतन म्हस्के, सुधाकर मोरे, उपसरपंच महादेव वाकोडे, भारत सोळंकी, मुख्याध्यापक शरद बंगाळे मंचावर उपस्थित होते.