कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही- बिरसा फायटर्स ; सुशिलकुमार पावरा यांनी पक्षांची ऑफर नाकारली

Aadivashi Ekta Manch Live
0

शहादा  -  बिरसा फायटर्स तर्फे लोकसभा निवडणूक २०२४ चा जाहीरनामा व घोषणापत्र ठरविण्यासाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली. बिरसा फायटर्स संघटना २ लोकसभा लढवणार असून नंदूरबार व दिंडोरीचे लोकसभा उमेदवार निश्चित झाले असल्यामुळे कोणत्याही पक्षाला व पक्षाच्या उमेदवारांना बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यायचा नाही,असे मिटींग मध्ये ठरविण्यात आले. अनेक राजकीय पक्षाचे उमेदवार बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा मागत आहेत. त्या पक्षांना बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यायचे नाकारले आहे.

     बिरसा फायटर्सचे नंदूरबार लोकसभेचे उमेदवार सुशिलकुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांची जनतेतून वाढती पसंती बघून अनेक राजकीय पक्षांनी सुशिलकुमार पावरा यांना आमच्या पक्षातर्फे निवडणूक लढवा, आम्ही तुम्हाला बी फाॅर्म देतो. अशी ऑफर देऊ केली.'तुमचे पक्ष आमच्या आदिवासी भागात चालणार नाहीत, आमची बिरसा फायटर्सच आमच्या भागात चालेल,बिरसा फायटर्सला लोकांनी स्वीकारलेले आहे,त्यामुळे मला तुमच्या पक्षाची तिकीट नको,आम्ही अपक्ष लढण्यास सक्षम आहोत', असे सांगत सुशिलकुमार पावरा यांनी अनेक पक्षांची ऑफर नाकारली आहे. मिटींग मध्ये बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सचिव संजय दळवी,प्रसिद्धीप्रमुख हसन तडवी,नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा,नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडनीस, नंदुरबार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,बारक्या पावरा,मनिषा पंधरे,संजय पावरा,गौतम पावरा,करन पावरा,रवींद्र पावरा,गोपाल भंडारी,राकेश वळवी,मालेगाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,नाशिक उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड, वडगाव अध्यक्ष राहूल चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !