अनुकंपाधारकांची सामायिक प्रतीक्षा सूची प्रसिद्ध

Aadivashi Ekta Manch Live
0

बुलडाणा : जिल्ह्याची सामाजिक प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर 15 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

अनुकंपाधारक उमेदवारांच्या सामायिक प्रतिक्षासूचीवर असलेल्या अनुकंपा उमेदवारांची दि. 1 जानेवारी 2024 रोजीची गट-क संवर्गाची जिल्हास्तरावरील तात्पुरती सामायिक प्रतिक्षा यादी अद्ययावत करण्यात आली आहे. सदर तात्पुरती सामायिक प्रतिक्षा सूची buldhana.nic.in या वेबसाईटवर, तसेच जिल्हा नाझर, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


सदर यादीवर आक्षेप, हरकती असल्यास अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेत वाढ करावयाची असल्यास, जात व जन्माचा रकाना निरंक असल्यास व इतर काही आक्षेप असल्यास आवश्यक माहितीसह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत आक्षेप, हरकती लेखी स्वरुपात सादर करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !