नवी दिल्ली - भारतीय राजकारणात सचोटीचा मापदंड निर्माण करणारे नेते म्हणून ओळखले जातात ; आडवाणी जी यांना ‘भारत रत्न’ देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय, म्हणजे कोट्यवधी भारतीयांचा गौरव करणारा निर्णय ; आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात, आडवाणी यांनी यांनी देश, संस्कृती आणि लोकांसाठी अथक लढा दिला ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल, गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे.
X या समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त करत, शाह यांनी लिहिले आहे, की लालकृष्ण आडवाणी यांनी आपले संपूर्ण जीवन, निस्वार्थीपणे देश आणि देशातील नागरिकांना समर्पित केले. देशाचे उपपंतप्रधान होण्यासह, विविध घटनात्मक पदांची जबाबदारी सांभाळतांना, त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा कस लावत, देशाची सुरक्षा, एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी, अभूतपूर्व काम केले. आडवाणी जी असे नेते आहेत, ज्यांनी राजकारणात, सचोटीचा एक मापदंड निर्माण केला, असंही शाह म्हणाले. देश, देशाची संस्कृती आणि इथले लोक यांच्या भल्यासाठी त्यांनी अथक लढा दिला. पक्ष आणि पक्षाची विचारसरणी मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे वर्णन शब्दबद्ध करणे कठीण आहे, असेही शाह म्हणाले. आडवाणी जी यांना मिळालेले ‘भारत रत्न’हा संपूर्ण देशबांधवांचा सन्मान आहे. असे अमित शाह म्हणाले.