राज्य उत्पादन शुल्कच्या मोहिमेत गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aadivashi Ekta Manch Live
0

पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी व आंबळे या ठिकाणी छापे टाकले.  या कारवाईत ५ वारस व ३ बेवारस अशा ८ गुन्ह्यांची नोंद करून ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २५ हजार लिटर रसायण, ३ दुचाकी वाहने व गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने व इतर कर्मचाऱ्यांनी केली. 


यापुढेदेखील पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

0000

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !