एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज धारणी कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परीपुर्ण अर्ज सादर करावा. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल.
प्रवेशासाठी अटीशर्ती : योजनेचा लाभ घेवु इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीच्या असावा, विद्यार्थ्यांच्या पालकाचे किंवा विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सांक्षाकिंत दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके असावे. तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे.
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्यांचे वैद्यकिय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच वीरपत्नी, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्ररेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकिय व निमशासकिय नोकरदार नसावेत. नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन दयावी लागेल.
इयत्ता दुसरीमध्ये प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जोडणे आवश्यक. अर्ज सादर करावयाचा दि. 20 फेब्रुवारी 2024 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दि. 15 मार्च 2024 पर्यतच राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : अर्जदार विद्यार्थ्यांचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अंगणवाडीचा दाखला पहिली इयत्तेसाठी ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्यांचा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला किंवा ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा, वीरपत्नी, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.
00000