राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे २६ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

Aadivashi Ekta Manch Live
0

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी  मान्यवर उपस्थित होते.

अर्थसंकल्पिय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !