आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राज्यस्तरीय आदर्श शाळा 2023 चा गौरव प्राप्त

आदिवासी एकता मंच Live
0
चाळीसगाव - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या प्रेरणेने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार अंतर्गत  मेहुणबारे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, मेहुणबारे ता. चाळीसगाव जि. जळगाव या शाळेने  2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये राबविलेल्या अनेक नाविन्यपूर्ण सहशालेय उपक्रम जसे वृक्षारोपण, विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभाग,शालेय गुणवत्ता, इत्यादी बाबत केलेले सादरीकरण याची दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श शाळा गुणवत्ता पुरस्कार 2023 सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गौरवपदक देऊन गौरविण्यात आले... 

         सदर पुरस्कार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र शाळेस प्राप्त झाले असून याबद्दल शाळेचे संस्था अध्यक्ष अण्णासाहेब राजेंद्र रामदास चौधरी, सचिव बापूसो विजय रामदास चौधरी यांनी माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !