आगामी नंदूरबार लोकसभा निवडणूक बिरसा फायटर्स लढणार सुशिलकुमार पावरा यांच्या नावाची पंचक्रोशीत चर्चा

Aadivashi Ekta Manch Live
0

शहादा :  आगामी लोकसभा निवडणूकीत बिरसा फायटर्सची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेची दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली. या सभेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा, महासचिव राजेंद्र पाडवी, सचिव संजय दळवी, उपाध्यक्ष गणेश खर्डे, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, प्रसिद्धीप्रमुख हसन तडवी, नंदूरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा, नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडनीस सह असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीत नंदूरबार लोकसभेचा बिरसा फायटर्सचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा मला आनंद आहे. बिरसा फायटर्स बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात ३५५ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. २६ लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.

संघटनेत शिक्षक,डाॅक्टर, वकील,आर्मी,पहिलवान, गायक, नृत्यक, संगितकार, लेखक, कवी,पत्रकार,शेतकरी,मजूर, विद्यार्थी,महिला तसेच आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे. बिरसा फायटर्स संघटनेची स्वतंत्र अशी आदिवासी विचारधारा आहे.आदिवासींच्या एकूणच विषयावर संघटना काम करते आहे.

चोपडाचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अवैध जात प्रमाणपत्रावरून त्यांना पदावरून हटवा,यासाठी बिरसा फायटर्सने याचिका दाखल केलेली आहे, बोगस आदिवासी, इतर जातींचा आदिवासींमध्ये आरक्षणाचा समावेश,पेसा भरती व शासनाच्या चूकीच्या धोरणांविरोधात काम करताना  बिरसा फायटर्सचे संघटना नेहमीच आघाडीवर असते.

समाजसेवा हीच आमच्या संघटनेची ओळख आहे. आमची संघटना पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत २६ सरपंच निवडून आणत असेल तर लोकसभेत खासदार व विधानसभेत आमदार निवडून आणण्याची क्षमता आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांत आहे. आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू. असा विश्वास बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !