अधिकारांचे तसेच कायद्याचे हनन केलेले आहे. आदिवासी हा निसर्ग पूजक आहे, त्यांना कोणताही विशिष्ट असा धर्म नाही. सदर मूर्ती बसवलेल्या ठिकाणी आदिवासीचे पारंपारिक पूजा स्थळ असून त्याठिकाणी पूर्वापारपासून पारंपारिक रीतीने पुजा अर्चना-विधी आणि त्या निमित्ताने येणारे सांस्कृतिक उत्सव होत आहेत.
त्या ठिकाणी आदिवासींच्या परंपरेनुसार कोंबडे, बोकडे यांची बळी देऊन पुजा तसेच उत्सव साजरे केले जातात. सदर धार्मिक मूर्तीच्या स्थापनेमुळे या ठिकाणी स्थापन केलेल्या धार्मिक मूर्तीचे उपासक व भक्त पुजा अर्चना व धार्मिक विधी करण्यासाठी गोळा होत आहेत व भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात होतील.
सदरील कृत्यामुळे आदिवासी संस्कृती व वनक्षेत्र व वन्यजीव-प्राणी यास धोका आहे. त्यामुळे आदिवासी समाज व संबंधित धर्माचे उपासक यांचेत संघर्ष होण्याची दाट शक्यता टाळता येत नाही. भविष्यात होणाऱ्या संघर्षास व परिणामास संबधित वनपाल, बेकायदेशीर धार्मिक अतिक्रमण धारक व शासन जबाबदार राहील.
गारबर्डी ता. रावेर हे गाव १००% आदिवासी लोकवस्ती असून भारतीय संविधानाच्या अनुछेद क्र. २४४ च्या खंड (१) मधील ५ वी व ६ वी अनुसूचीमध्ये येते, त्यामुळे तेथे पेसा कायदा १९९६ लागू आहे. तसेच सदरील क्षेत्र हे वन्यजीव विभाग, वनक्षेत्रामध्ये येते. कायद्याने अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभेचे परवानगीशिवाय कोणतीही काम किंवा गतीविधी करता येंत नाही,
व अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी महाशय आपली असून आदिवासी समाज बांधवांचे संरक्षक या नात्याने आपण आपली जवाबदरी चोख पार पाडाल असा आम्हाला विश्वास आहे.
सदर वनपाल यांनी वनक्षेत्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून धार्मिक देवतेची स्थापन केलेल्या मूर्ती च्या ठिकाणी दिनांक २७ व २८ /१/२०२४ रोजी भुसावळ ते गारबर्डी (सदरील मूर्ती स्थापन केलेले ठिकाण) येथे पायी दिंडीचे आयोजन केलेले आहे.
त्यानिमित्ताने तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा होवून ते लोक तेथे त्यांचे धार्मिक विधी करतील त्यामुळे आदिवासी समाज व बेकायदेशीर मूर्ती बसवणारे यांच्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
तरी महोदयांनी सदरली बेकायदेशीररित्या केलेल्या धार्मिक देवतेच्या मूर्ती चे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे, तसेच कर्तव्यात कसूर केलेले वनपाल यांचे वर कायदेशीर कार्यवाही करणे आणि अतिक्रमण करून धार्मिक देवतेची स्थापन केलेल्या मूर्ती च्या ठिकाणी दिनांक २७ व २८ /१/२०२४ रोजी भुसावळ ते गारबर्डी येथे पायी दिंडी त्तात्काळ थांबविणे, विनंती निवेदनाच्य माध्यमातून करण्यात आली निवेदन देते वेळी उपस्थित जहाँगीर जहाँबाज तडवी ( जिल्हा सचिव), फत्तु रज्जाक तडवी ( जिल्हा सचिव), लुकमान कलिंदर तडवी ( जिल्हा उपाध्यक्ष) , सबदल छबु तडवी ( जिल्हा संघटक) , सर्फराज इतबार तडवी (जिल्हा सदस्य) , जहाँगीर रौदल तडवी ( जिल्हा सदस्य) , निजाम इसन तडवी (जिल्हा सदस्य) , कुर्बान बशीर तडवी ( जिल्हा सदस्य) , खलिल नबाब तडवी ( जिल्हा सदस्य) , तमिज रमजान तडवी ( जिल्हा सदस्य) , जहाँगीर शेरखॉ तडवी ( जिल्हा सदस्य) इतर सदस्य उपस्थित होते