एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत असलेल्या एकलव्य निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावे - प्रकल्प अधिकारी मंदार पत्की

आदिवासी एकता मंच Live
0

नंदुरबार - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत असलेल्या एकलव्य निवासी शाळेत सन 2024-25 वर्षात इयत्ता 6 वी साठी प्रवेश व इयत्ता 7 ते 9 मधील रिक्त जागा भरण्यासाठी रविवार 25 फेब्रूवारी 2024 रोजी प्रवेश पूर्व परिक्षा घेण्यात येणार असून यासाठी पालकांनी अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सद्यस्थितीत एकलव्य निवासी शाळा धडगांव ही शासकीय आश्रमशाळा सलसाडी ता. तळोदा, एकलव्य निवासी शाळा खरवड ता. तळोदा ही शासकीय आश्रमशाळा आलिविहीर ता. अक्कलकुवा येथे तर  एकलव्य निवासी शाळा अक्कलकुवा ही शासकीय आश्रमशाळा तालंबा ता. अक्कलकुवा येथे कार्यरत असून शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता इयत्ता 6 वी करिता 30 मुले व 30 मुली प्रवेश व इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वी मधील रिक्त जागा भरावयाच्या आहेत.

निवासी शाळेत प्रवेशासाठी अटी-
• इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित, आदिम जमातीचा (एस.टी.) किंवा डीएनटी, एनटी, एसएनटी असावा.
• इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील रिक्त अनुशेष भरण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित, आदिम जमातीचा (एस.टी.) असावा.
• विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 6 लाखापेक्षा कमी असावे.
• प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षेसाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित, आदिम जमातीचे (एस.टी.) किंवा डीएनटी, एनटी, एसएनटी विद्यार्थी असावा.
• वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 ते  8 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 6 वी, ते 9 वी साठी प्रवेशास पात्र असतील.
• वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता ७ वी, ते ९ वी साठी ज्या एकलव्य शाळांमध्ये विद्यार्थी अनुशेष असेल केवळ त्याच जागा भरण्यात येतील.
• विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश देण्यात येईल.
• विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रात पाहिजे असलेल्या एकलव्य शाळांबाबत पाच पसंतीक्रम द्यावेत.
• या परिक्षेसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी इयत्ता ६ वी साठी व इयत्ता ६ वी मध्ये शिकणारा इयत्ता ७ वी साठी तर इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा इयत्ता ९ वी साठी अर्ज करु शकेल.
• अर्ज प्रकल्प कार्यालय तळोदा येथे तसेच एकलव्य शाळा सलसाडी, अलिविहीर व तालंबा येथे उपलब्ध आहेत. झेरॉक्स, चुरगळलेला, फाटलेला व अपूर्ण अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाही.
• तळोदा तालुक्यासाठीचे अर्ज शासकीय आश्रमशाळा आलिविहीर येथे, अक्कलकुवा तालुक्यातील अर्ज शासकीय आश्रमशाळा तालंबा येथे व धडगांव तालुक्यातील अर्ज शासकीय आश्रमशाळा सलसाडी येथे स्विकारण्यात येतील, प्रकल्प कार्यालय येथे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
• शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अर्ज करता येणार नाही. तथापि, अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी प्रवेश घेतल्यास संबधितांवर जबाबदारी निश्चित करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
• अर्जासोबत जन्म दाखला, बोनाफाईड सर्टीफिकेट व इतर अत्यावश्यक सर्व कागदपत्रांची सांक्षाकित प्रती जोडणे आवश्यक असेल.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी २०२४ असुन मुदतीनंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पत्की यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !