जळगाव - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री विजयरावजी चौधरी यांच्या जळगाव जिल्हा पूर्व, पश्चिम व महानगर संघटनात्मक आढावा बैठक व गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नमो चषक, नमो ॲप, सरल ॲप, दिवारलेखन, संघटनात्मक बांधणी, वस्तीपाडा संपर्क अभियान, पक्षप्रवेश, सुपर वॉरियर, बुथरचना आदि विषयावर प्रदेश महामंत्री विजयी चौधरी यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आमदार मा. सुरेश भोळे (राजूमामा),प्रदेश सचिव श्री अजय भोळे, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री अमोल जावळे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री नंदू भाऊ महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख श्री विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस श्री सचिन पान पाटील, यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.