चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव-, बेलदारवाडी , गणपूर ,वलठाण या रस्त्याची रस्त्याचा वनवास संपला.- आमदार मंगेश चव्हाण ; रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भरीव निधी मंजूर

Aadivashi Ekta Manch Live
0

चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी) ग्रामविकास मंत्री ना.गिरीष  महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गेली अनेक दशके दुर्लक्षित असणाऱ्या रस्त्यांचे भाग्य उजळले

चाळीसगाव - कोदगाव - बेलदारवाडी - गणपूर - वलठाण या रस्त्याची अवस्था काही वर्षांपासून अतिशय दयनीय झाली होती. तीन ते चार गावांचा मुख्य वापराचा रस्ता असल्याने तसेच बागायती शेती असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा होता. त्यामुळे त्याची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. मात्र सदर रस्ता हा ग्रामीण मार्ग असल्याने त्याला जास्त निधी मंजूर करता येत नव्हता.

म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून व चाळीसगाव तालुक्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव - बेलदारवाडी - गणपूर - वलठाण या १२ किमी नवीन रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला आणि आता त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाळीसगाव - कोदगाव - बेलदारवाडी - वलठाण या रस्त्याचा वनवास संपल्याने सदर परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !