मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या,शिंतपेय पुरवठा विक्रीवर कार्यवाही करण्याची मागणी चे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नंदुरबार यांचे नंदुरबार जिल्ह्याधिकारी यांना निवेदन

Aadivashi Ekta Manch Live
0

नंदुरबार आज दि.३०/१/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी नंदुरबार जिल्हाअध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या आदेशानूसार व जिल्हाध्यक्षा सौ मंजुळाताई पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडी धडगाव तालुक्याच्या वतीने  व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धडगाव तालुकाध्यक्ष श्री.राहुल पावरा यांच्या नेतृत्वाखाली व महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.हिनाताई वळवी यांच्या

वतीने धडगाव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की धडगाव शहरातील विविध दुकानांवर भेसळयुक्त दुध, मुदतबाह्य पाण्याच्या बाटल्या,शिंतपेय पुरवठा विक्री होत आहे वेळोवेळी तक्रार देऊन ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही

प्रशासन का कारवाही करत नाहीत ? का नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे पहिले अतिदुर्गम भाग इथं आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे आणि जर अश्या प्रकारे मुदतबाह्य वस्तू विक्री होत असेल तर लहान पासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतांना दिसत आहे,

तरी आपण‌ जर योग्य ती कारवाई केली नाही तर येत्या आठ दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समोर महिला आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल ही दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस धडगाव तालुकाध्यक्ष श्री राहुल दादा पावरा, शहराध्यक्ष श्री दारासिंग पावरा,युवक शहराध्यक्ष सचिन पावरा,अनिल पावरा,नायली पावरा,भारती वसावे,हानीबाई पावरा,सतीबाई पावरा,वसताबाई पावरा, अमिताभ वळवी,गोरख वळवी,विक्रम वळवी,जोमा वळवी,हिरालाल वसावे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !