नंदुरबार - नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागास व गरजु आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांनी शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वर्ष 2023-24 साठी ही योजना मंजूर झाली असून या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आपला अर्ज तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावा.
या योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा, महाराष्ट्रातील वास्तव 15 वर्षाचे असावे, स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, स्वत:चे किंवा कुटूंबियाचे पक्के घर नसावे, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांस प्राधान्य देण्यात येईल.
लाभार्थ्यांने अर्जासोबत नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईचे फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, जमातीचा प्रमाणपत्र, सातबारा किंवा नमुना 8-अ, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, शिधा पत्रिका, आधार कार्ड व रद्द केलेला धनादेश अशी कागदपत्रे जोडावीत असेही श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000000