दुर्गम भागातील आदिवासींसह तळागाळातील लोकांना कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणे तसेच सरकारी योजनांची 100% संतृप्ती करणे हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट : अर्जुन मुंडा

आदिवासी एकता मंच Live
0

प्रधानमंत्री जनमन मिशनच्या मुख्य केंद्रित क्षेत्रांपैकी आदिवासी आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र : अर्जुन मुंडा

नवी दिल्ली - केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्धतेपासून कोणीही वंचित राहाता कामा नये’ या संकल्पनेबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देशातील गरीबातील गरीबासाठी आरोग्य सुरक्षा प्रदान करण्याचा भारत सरकारचा उपक्रम हा या संवांदाचा केंद्रबिंदू होता. केंद्रीय राज्यमंत्री (कृषी आणि शेतकरी कल्याण) शोभा करंदलाजे; लोकसभा सदस्य परवेश साहिब सिंग वर्मा; राज्यसभा सदस्य इंदू बाला गोस्वामी यांच्या उपस्थितीत हा संवाद झाला. 

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा प्रारंभ झारखंडमधील रांची येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी करण्यात आला, याची अर्जुन मुंडा यांनी आठवण करून दिली. ही योजना  देशातील सर्वात गरीब लोकांना आरोग्य सुरक्षा प्रदान करत आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानीत आरोग्य सेवा योजना असून याद्वारे 55 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सेवा पुरवण्याचे लक्ष्य निर्धारित आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशाने आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती केली आहे, असे याबाबत अधिक माहिती देताना अर्जुन मुंडा म्हणाले.  आज देशात प्रथमच आरोग्याला विकासाची जोड दिली जात आहे.  किंबहुना, आता देशात “निरोगी राष्ट्र, श्रीमंत राष्ट्र” अशी व्यापक भावना निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे देशात आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र (AB-HWCs) स्थापन करणे हा आहे. ही केंद्रे आता आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणून ओळखली जातात. आयुष्मान आरोग्य मंदिर सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) लोकांच्या घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टासह सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या प्रोत्साहनात्मक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, उपशामक आणि पुनर्वसनात्मक पैलूंना एकत्रित करते.

18 डिसेंबर 2023 पर्यंत, या आयुष्मान आरोग्य मंदिरांनी मिळवलेल्या यशाची एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे आहे :

भेट देणाऱ्यांची संख्या - 227.41 कोटी
निरोगीपणाबाबत मार्गदर्शक सत्रे - 2.81 कोटी
उच्च रक्तदाब तपासणी – 55.72 कोटी
मधुमेह तपासणी – 48.49 कोटी
तोंडाच्या कर्करोगाची तपासणी – 32.83 कोटी
स्तनाच्या कर्करोगाची तपासणी – 14.92 कोटी
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी – 10.05 कोटी

* * *

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !